दुष्काळी परिस्थितीशी सामना करणा-या सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्याबरोबरच पाण्याचे अखंड स्त्रोत निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून १३ हजार ८०० विहिरींची कामे संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. यापैकी ६ हजार ७६७ विहिरींची कामे पुर्ण झाली आहेत. इतक्या मोठया प्रमाणावर रोहयोतून विहिर खोदाई करणारा सोलापूर जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडुन दुष्काळी भागांबरोबरच इतर तालुक्यांमधुन सन २०१२-१३ मध्ये रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त विहीरीं खोदण्याचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. साधारणत: संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनला पहिला पाऊस पडतो. परंतू सोलापूर जिल्ह्यात मात्र १ जुलैच्या पुढे पाऊस पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणा-या या जिल्ह्याला पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची गरज भासत होती. ही गरज लक्षात घेऊन २ हजार ४७० विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे.
पाणीटंचाई बरोबरच जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होण्याकरीता १०९ चारा छावण्या सुरु आहेत. त्यापैकी सांगोला तालुक्यात ९३, माढयात ६, करमाळयात ८ तर पंढरपूरमध्ये २ चारा छावण्या आहेत. या चारा छावण्यामधुन मोठी एक लाख १६६१ आणि लहान १२ हजार ३ अशी एकूण एक लाख १३ हजार ६७४ जनावरांना चारा पुरविण्यात येत आहे. या चारा छावण्यांकरीता शासनाकडुन ८३ कोटी ४ लाख १२ हजार ९६० रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी ७९ कोटी ६० लाख ३३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठयासाठी २२९ टँकर सुरु असून या व्दारे जिल्ह्यातील १५० गावांना व १०६४ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोला तालुक्यात ७४ टँकर, मंगळवेढयात १३, माढयात ४५, करमाळयात ४०, माळशिरसमध्ये ९, मोहोळमध्ये १, बार्शी आणि पंढरपूरमध्ये अनुक्रमे ४ टँकरव्दारे पाण्याची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. याकरीता ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हयातील ८१६ कामांव्दारे ८ हजार ४०० मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यातील ५१ कामे कृषी व पुरक सेवा, रस्त्यांची २४, पाटबंधा-याची ७, विहिर खोदाईची ४२१, विहिर पुर्नभरणाची ५०, नर्सरीची २४४, वृक्ष लागवडीची १८ आणि इतर १ अशी विविध कामे सुरु आहेत. एकंदरीत दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना अंमलात आणल्या असून दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.