उस्मानाबाद -: जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी 2013 रोजी राबविण्यात येत असून यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ डोस पाजण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील शहरी विभागातील एकुण 148 लसीकरण बुथ (केंद्राची)सोय करण्यात आलेली आहे. अनुक्रमे उस्मानाबाद येथे 45, तुळजापूर-21, उमरगा-19, नळदुर्ग -16, मुरुम-15, कळंब-16, भूम-8, परंडा-8 याप्रमाणे लसीकरण बूथ केंद्रांची सोय करण्यात आलेली आहे,
याशिवाय बसस्थानक, बाजार, बांधकामे, टमटम स्टँड आदि ठिकाणी ट्रान्झीट टिमची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून 0 ते 5 वर्षातील बालकांना पोलीओ डोस पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. आर. धाकतोडे यांनी केले आहे.