नळदुर्ग -:  रासायनिक खते, किटक नाशके यांच्‍या अती वापरामुळे भुपृष्‍ठावरील पाणी प्रदुषित झाले आहे. त्‍यामुहे जलचर जीव नष्‍ट होण्‍याच्‍या मार्गावर आहे, असे मत गुलबर्गा विद्यापीठाचे प्राणी शास्‍त्र विभागाचे प्रा.डॉ. विजयकुमार यांनी व्‍यक्‍त केले.
     नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयात जै‍वविविधता - निसर्ग, नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोग व महाविद्यालयीन प्राणी व मत्‍स्‍य विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजिलेल्‍या राष्‍ट्रीय चर्चासत्र परिषदेच्‍या समारोप प्रसंगी प्रा.डॉ. विजयकुमार हे बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी आमदार नरेंद्र बोरगावकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान शाखेचे अधिष्‍ठाता डॉ. अशोक मोहेकर, प्राणी शास्‍त्र मंडळाचे अध्‍यक्ष प्रा.डॉ. संभाजी शिंदे, प्राचार्य डॉ. महम्‍मद वियाज, कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, बालाघाट शिक्षण संस्‍थेचे संचालक देविदास राठोड, प्रभाकरराव नळदुर्गकर, अँड. प्रदीप मंटगे, प्रा.डॉ. एम.जी. बाबरे, उपप्राचार्य नरसिंग माकणे आदीजण उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे स्‍वागत पर प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. सुहास पेशवे यांनी तर परिषदेचे अहवान वाचन प्रा.डॉ. उमाकांत चनशेट्टी व संयोजक प्रा.डॉ. एस.जी. बाबरे यांनी केले. या दोन दिवस चाललेल्‍या राष्‍ट्रीय परिषदेत गुलबर्गा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्‍हापूर, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत मह‍ाविद्यालयातील 62 संशोधक प्राध्‍यापकांनी तर 40 विद्यार्थींनी संवाद साधून शोध निबंध सादर केले. तर डॉ. व्‍ही.एस. सोमवंशी, डॉ. महम्‍मद हाफीज, डॉ. वाय.के. खिल्‍लारे, डॉ. पी.बी. साठे, डॉ. के. रविंद्र रेड्डी, डॉ. बी.एल. चव्‍हाण, डॉ. पी.एल. सोनवणे, डॉ. के. विजयकुमार यांनी मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. मनोज झाडे, प्रा. तुळशीराम दबडे व प्राध्‍यापिका झरीना पठाण यांनी तर आभार प्रा.डॉ. मोहन बाबरे यांनी मानले. परिषद यशस्‍वी करण्‍याकरीता समन्‍वय प्रा.डॉ. हंसराज जाधव, प्रा.डॉ. समीर पाटील, प्रा. पवन मुडबे, प्रा. निलेश शेरे, प्रा. डॉ. मिर्झा, प्रा.एस.आर. माने यांच्‍यासह प्राध्‍यापक, विद्यार्थी व शिक्षकत्‍तेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top