![]() |
मा्रूती बनसोडे |
मुर्टा (ता. तुळजापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालय व परिवर्तन सामाजिक संस्थेच्याच्यावतीने आयोजित गावसभा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भ.ना. कदम तर प्रमुख अतिथी म्हणून भैरवनाथ विद्यालयाचे सहशिक्षक भैरवनाथ कानडे, युवा नेते गोपाळ सुरवसे, ग्रा.पं. सदस्य जयसिंग गवळी, सुनिता कुरदुरे, सुमन लाखे, माजी सैनिक कुमार मोरे, निलकंठ इटकरी आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले की, आपल्या गावाची ओळख महाराष्ट्राला होण्यासाठी आपल्या गावात आपण वैशिष्टयपूर्व काम केले पाहिजे. याबाबतची माहिती देताना गावात संपुर्ण स्वच्छता अभियान राबविले पाहिजे, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात सहभागी झाले पाहिजे. प्रत्येक घरातील महिला बचतगटात आल्या पाहिजेत. त्याशिवाय शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी लोक सहभाग व लोकवाटा देण्याची तयारी असली पाहिजे. पर्यावरण संतुलन समृध्द गाव योजनेत सहभाग घेऊन गावात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावे, शंभर टक्के शौचालय बांधुन त्याचा वापर केला पाहिजे. या विषयाबद्दल माहिती देऊन बचतगटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन महिलाच्या आर्थिक उन्नतीसाठी गावातील महिला व लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदीप कदम यांनी केले. या कार्यक्रमास गावातील महिला, शेतकरी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.