नळदुर्ग -: ये‍थील नगरपालिकेच्‍या नगराध्‍यक्षपदी कॉंग्रेसचे गट नेते शब्‍बीर महेमुदअली सय्यद सावकार यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली आहे. यावेळी फटाके फोडुन व पेढे वाटून त्‍यांच्‍या चाहत्‍यानी एकच जल्‍लोष केला. दरम्‍यान शहरातुन वाद्याच्‍या गजरात भव्‍य मिरवणुक काढण्‍यात आली.
           नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष नितीन कासार यांनी आपल्‍या पदाचा राजिनामा दि. 18 डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे दिल्‍याने रिक्‍त झालेल्‍या नगराध्‍यक्षपदासाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्‍यात आले होते. या निवडणुकीकरिता कॉग्रेसचे शब्‍बीरअली सय्यद सावकार याचा एकमेव अर्ज आल्‍याने बिनविरोध निवडून आल्‍याचे पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांनी जाहिर केले. तर सहाय्यक म्‍हणून मुख्‍याधिकारी टी.डी. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी नगरपालिका कर्मचारी संघटनेच्‍यावतीने डी.एन. कस्‍तुरे यांनी नुतन नगराध्‍यक्ष शब्‍बीर सावकार यांचा सत्‍कार केला. यावेळी त्‍यांच्‍या चाहत्‍यांनी फटाक्‍याची आतिषबाजी करुन एकच जल्‍लोष केला. याप्रसंगी उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी, मावळते नगराध्‍यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक सुधीर जगदाळे, माजी नगराध्‍यक्षा तथा विद्यमान नगरसेविका निर्मला गायकवाड, देविदास राठोड, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रणजितसिंह ठाकूर, बाबु कुरेशी, सुभद्रा मुळे, कल्‍पना गायकवाड, सुर्यकांत पाटील, कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष संजय दळवी, शहर युवक अध्‍यक्ष बसवराज धरणे, शहराध्‍यक्ष जावेद काझी, नगरसेविका सुप्रिया पुराणिक, मुन्‍वर सुलताना कुरेशी, सुफिया कुरेशी, जिलानी कुरेशी, दयानंद बनसोडे, एजाज सावकार, आखिर जहागिरदार, मकबुल नदाफ, कमलाकर डुकरे यांच्‍यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदीसह अनेकानी नुतन नगराध्‍यक्ष शब्‍बीर सावकार यांचा सत्‍कार करुन शुभेच्‍छा दिल्‍या.
 
Top