उस्मानाबाद -: दुष्काळी भागातील जनतेस पिण्याचे स्वच्छ पाणी व रिकाम्या हातांना रोजगार उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाटोदा, करजखेडा या भागातील दूष्काळी पाहणी दौ-याप्रसंगी दिली.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, संघटक राजाभाऊ शेरखाने, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, तहसीलदार अभिजीत पाटील, सरपंच उषाताई कांबळे, शाखा अभियंता व्ही. एम. सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण यांनी बरमगाव, पाटोदा, करजखेडा या दुष्काळी भागाचा दौरा केला. याप्रसंगी करजखेडा येथील आमदार निधीतून १०० मीटर रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जनतेच्या तक्रारी ऐकून घेत त्यांनी ज्या विंधन विहीरीला मुबलक पाणी आहे, परंतु विद्युत मोटारी बंद आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.
सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थती असल्याने व यंदा अपुऱ्या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी साठवणूक करण्यासाठी नदी, नाले व तलावातील गाळ काढणे आवश्यक आहे. छतावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जावू न देता त्या पाण्याचे पुर्नभरण करुन त्याचा पुनर्वापर करणे आवयश्क आहे. आतापासूनच सर्वांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
जनतेला काम कमी पडणार नाही याची काळजी शासकीय यंत्रणेनी घेतली असल्याचे नमूद करुन ते पुढे म्हणाले की, रोजगार हमी योजनेवरील कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. गावच्या नियमित ग्रामसभा झाल्या पाहिजेत, यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी या परिसरातील सरपंच, ग्रामसेवक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.