उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनीट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर इत्यादी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वीत झाली आहे. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-यांनी संबंधित जिल्हयांच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी केले आहे.
अर्ज करणा-या स्वयंसहाय्यता बचत गटांतील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवाशी असावे व एकूण सदस्यांपैकी ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असलेल्या व वरील अटीची पुर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व इतर साहित्यासाठी शासनाकडून कमाल रु. ३ लाख १५ हजारापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ८० टक्के अनूसूचित जातीचे सदस्य असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.