महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा अभियान हे 1 ते 15 जानेवारी या पंधरवड्यात राबविण्यात येत आहे. “जीवन सांभाळा” दारु पिऊन वाहन चालवू नका, असे घोषवाक्य या वर्षीचे आहे. देशात 1 ते 7 जानेवारी हा कालावधी 24 वा रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. आपण मात्र महाराष्ट्रात हे अभियान पंधरा दिवस राबवितो. रस्ता सुरक्षेबाबत आपण अधिक जागरुक असावे यासाठीचा हा प्रयत्न आहे.
त्याची अधिक ओळख व्हावी यासाठी हा लेख...
2011 या वर्षात महाराष्ट्रात झालेल्या एकूण 68.438 अपघातांमधून 13,057 व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या तर 45.616 गंभीर जखमी झाल्या. एकूणच झालेल्या अपघाताचे हे चित्र निश्चितच भयंकर आहे. हे गंभीर चित्र पाहता राज्यात रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती होणे नागरिकांच्या जीवाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. म्हणूनच केवळ सप्ताह न राबविता जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा अभियान हे पंधरवड्यात म्हणून राबविण्यात येत आहे.
केवळ पंधरवडया पुरतेच हे अभियान न ठेवता याकडे गंभीरतेने पहावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी नुकतेच केले. त्यांनी सांगितले की, वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण केल्यास साधारणत: 78 टक्के अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे, 2 टक्के अपघात दोषी वाहनांमुळे तर 1.3 टक्के अपघात रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे आणि उर्वरित अपघात वाईट हवामान, रस्त्यावरील सुरक्षा चिन्हांचा अभाव, रिफ्लेक्टर्स नसणे इत्यादी कारणांमुळे होतात.
थोडक्यात म्हणजे वाहन चालकांच्यामुळे होणारे अपघात हे टाळता येऊ शकणारे आहेत. म्हणूनच त्यांची जनजागृती महत्वाची आहे आणि यासाठी शासनाच्या परिवहन व पोलिस विभागांसोबतच नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आणि या वर्षीचा अभियानाचे घोष वाक्य जीवन सांभाळा : दारु पिऊन वाहन चालवू नका असे आहे.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. शहरांसोबतच खेडे गावात, अँटो वा जीप मधून मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी घेऊन वाहने चालविली जातात. प्रसंगी चालक त्याच्या वाहनाच्या जेमतेम बसलेलाही नसतो आणि एखादा पोलिस अथवा पोलिसाची गाडी त्याने पाहिली तर जिवाच्या आकांताने तो गाडी पिटाळतो परिणामी मोठा अपघात होतो. अनेक निरापराध नागरिक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे अशासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
या संदर्भात विचार केला असता असे लक्षात येते की, नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. केवळ लवकर जायला मिळते म्हणून ते लटकून गाडीत उभे राहतात आणि दुर्दैवाने अपघात घडला तर आपला जीव गमावता. अशावेळी नागरिकांनी देखील अवैध प्रवासी वाहनात बसण्यास ठामपणे नकार देऊन त्या वाहन चालकास वठणीवर आणायला काहीच हरकत नाही. थोडा बहुत वेळेचा अपव्यय होईल मात्र त्यामुळे जीव वाचेल हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
तसेच यावर्षीच्या घोषवाक्यानुसार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपले विचार मांडले की, लोकांनी दारु पिऊन वाहने चालवू नये यासाठी आम्ही विशेष मोहिमा राबविल्या. त्यात बरेच लोक सापडले त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द केले. दंड केला. तरीही यावर्षी बरेच लोक सापडले.
असे का घडते ? कायद्याचा काही धाक आहे की नाही ? याचाही विचार आपण करावा. याच साठीच तर जनजागृती महत्वाची आहे. लोकांनाच आपण दारु पिऊन गाडी चालवू नये असे वाटणे महत्वाचे आहे. प्रसंगी कायदे कडक केले जातील. निश्चितच कायाद्याचा धाक हवाच पण त्यापेक्षा मनाचा धाक महत्वाचा आहे. तो असावा वा वाटावा म्हणून प्रखर जनजागृती होण्याची आवश्यकता आहे आणि ती जबाबदारी तुम्हा, आम्हा सर्वांची आहे.
शासकीय उपाययोजना
या पंधरवडयात जनजागृतीसाठी शासनामार्फत विविध उपाययोजना सुरु आहेतच. यात विविध चर्चासत्र, शिबीरे, आरोग्य शिबीरे, चौकसभा घेणे, बॅनर्स लावते. माहिती पत्रके, हॅन्ड बिल वाटणे, विशेष मोहिमा राबविणे, महामार्गावरील जाण्याऱ्या बैलगाड्या आदिंना रिफ्लेक्टर लावणे. दवाखाने, ॲमब्युलन्स, क्रेन, पोलीस स्टेशन आदींचे दूरध्वनी असलेले फलक लावणे तसेच शाळकरी मुलांनाही यात सामील करुन त्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी तयार करणे. जनजागृतीसाठी चर्चासत्र, चित्रकला स्पर्धांचे आयोजन तसेच रस्ता दुरुस्ती व सोयी सुविधा अशी कामे या काळात होणार आहेतच. याशिवाय एसएमएसद्वारेही जनजागृती सुरु आहे.
यासाठी पोलीस व परिवहन विभागास मदत म्हणून महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय इतर संबंधित संघटना कार्यरत आहेतच. तथापी या सर्वांना महत्वाची साथ हवी ती नागरिकांची. या पंधरावड्या निमित्त आपण सर्व नागरिक ‘अपघात विरहित वर्ष ’ कसे होईल असा प्रयत्न करु यात आपल्या प्रयत्नांला शासनाची भरीव साथ नेहमीच आहे.
राजू पाटोदकर
patodkar@yahoo.co.in