उस्मानाबाद -: बालचित्रपट समिती, मुंबई आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आजपासून बालचित्रपट महोत्सवास सुरुवात झाली. उस्मानाबाद शहरातील श्रीचित्रपटगृह येथे सकाळी 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बालचित्रपट महोत्सवाचे उदघाटन झाले.
शालेय मुलांना बोधप्रद व शिक्षणाभिमुख आणि संस्कारमुल्य असणारे चित्रपट पहाता यावेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आजी आजोबा, दुभाषी, बालशिवाजी, सेनानी साने गुरुजी या मराठी चित्रपटासह मल्ली,क्रिसटीस बाल्टीबॉय, राहिनो आणि अभय हे हिंदी चित्रपट दाखविले जाणार आहेत. हे चित्रपट मुलांसाठी मोफत दाखविले जाणार आहेत.
शहरातील बालचित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी बालचित्रपट समितीचे सहायक वितरण अधिकारी पी.आर.हलदर,माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजनाथ खांडके, विस्तार अधिकारी अशोक खुळे, मराठी कन्या शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.माळी, करमणूक कर निरीक्षक जीवन कुलकर्णी आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांची उपस्थिती होती .
या महोत्सवाअंतर्गत मुरुम,ता.उमरगा येथील महेश टॉकीज येथे, उस्मानाबाद शहरात ताजमहल टॉकीज आणि श्रीचित्रमंदिर येथे चित्रपट दाखविले जाणार आहेत.हा महोत्सव 19 जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून विविध शाळांमध्येही चित्रपट दाखविण्याची व्यवस्था शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. ज्या शाळांकडे प्रोजेक्टर आहेत त्यांनाही या चित्रपटांच्या प्रिंन्टस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या मुलांना शाळेतच चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.