उस्मानाबाद -: राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या निधीतून प्रथीनयुक्त पशुजन्य उत्पादनात भरीव व्हावी, या योजनेअंतर्गत शेळी गट (कोकरु) वाटप आणि दोन गोट स्काऊट लाभार्थीस अर्थसहाय देण्यासंदर्भातील निवड प्रक्रीया दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने समिती गठीत केली असून या समितीची बैठक येथे उपरोक्त वेळेत होत असून यावेळी चिठ्ठ्या टाकून सोडत पध्दतीने लकी (ड्राव्दारे) लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यावेळी हजर राहण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.एस.एस. भोसले यांनी केले आहे.