आपल्या देशात १८ वर्ष पूर्ण केलेलया सर्व स्त्री - पुरुषांना, नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, अशा लोकांनाच प्रामुख्याने मतदार असे संबोधले जाते. शिक्षण, जात, धर्म असा भेदभाव न करता सर्व प्रौढ नागरिकांना मताधिकार असावा हेच तत्व आपल्या 'मतदार' या संकल्पनेतून मांडले गेलेले आहे. मतदाराचे कर्तव्य म्हणजे उमेदवाराची निवड करुन कारभार पाहण्यास समर्थक बनविणे होय.  प्रत्येक मतदारांने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व उमेदवाराची नेमणूक केली पाहीजे हे मतदारावर असलेले एक प्रकारचे बंधनच आहे.
      'मतदार' एक मतदारसंघातील महत्त्वाचा घटक मानला जातो व त्या अनुषंघानेच त्याला मतदानामध्ये महत्त्व दिले जाते.  मतदारांना लोकशाहीमार्फत स्थानिक पातळीवर प्रतिनिधी निवडताना उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन सहजपणे करता येते. जबाबदारीने मतदानाचा अधिकार बजावून योग्य व्यक्तीची निवड करण्याचे शिक्षण मतदाराला स्थानिक शासन संस्थाच्या निवडणूकीमुळेच मिळत आलेले आहे. त्यामुळे अलीकडील काळात अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत आहे. मतदार हा एक मतदानाचा पाया आहे. कोणत्याही उमेदवाराला योग्य त्या रितीनेच त्याचे मन जिंकावे लागते. कारण, उमेदवाराला अधिकाधिक मतांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करायचे असेल तर मतदाराचे महत्त्व समजवून घ्यावे लागते.
    भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून लोकशाही प्रणाली अवलंबली गेली आणि तेव्हापासून लोकांच्या कल्याणासाठी लोकांमार्फत चालवण्यासाठी विविध पक्षाची निर्मिती करण्यात आली. तो पक्ष एका विशिष्ट पद्धतीने म्हणजेच मतदानातर्फे 'पक्ष' निवडून दिला जातो.
    आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशामध्ये अनेक कितीतरी लोक कंगाल आहेत पण याच कंगाल लोकांनी म्हणजेच मतदारांनी आपले हक्क बजावून जर स्वातंत्र्य प्राप्त केले ना, तर या राजकीय पक्षात गोंधळच गोंधळ उडतो असे कानावर येतो. मतदाराला स्वत:च्या हक्काची माहिती करुन घेण्यासाठी स्थानिक शासनसंस्था मदत करतात. मतदार हा एक गुप्तधारी नागरीक असतो आणि यामुळेच मतदानाला अधिकाधिक मदत होते आणि मतदान यशस्वीरित्या सफल होते.
    मतदाराने कोणाला मत दिले, हे गुप्त ठेवले जाते.  त्याकरिता मतपत्रिकेवर मतदाराचे नाव किंवा स्वाक्षरी नसते. मतदार मत नोंदवत असताना तेथे कोणीही व्यक्ती उपस्थित राहू शकत नाही. आवश्यकतेनुसार इलेक्ट्रानिक्स यंत्राच्या साहाय्याने मतदार आपले मतदान पार पाडू शकतो.
    राज्यसभा असो अथवा लोकसभा असो कोणत्याही सभेची निवडणूक करायची असेल तरीही मतदार हा आवश्यक असतोच. मतदार एक प्रकारची मतदानाची शक्‍तीच म्हणता येईल. मतदाराने आपले मत नाहीच नोंदवले तर कोणत्याच पक्षाला म्हणावी तशी प्रगती करता येत नाही. मतदाराला आपले मत सहजरित्या मांडता येते. मत कोणत्या मतदार पक्षाला टाकावे हे फक्त निवडण्याचा अधिकार मतदारालाच आहे. कोणत्याही उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून यायचे असेल तर प्रत्येक मतदाराच्या आणि प्रत्येक मताला योग्य ते महत्त्व दयावे लागते अन्यथा निवडून येणे कदापि शक्‍य नाही.
    उमेदवारांने निवडून येण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी शेवटी मतदारांनी कितपत आपले यशस्वी मतदान केले यांवर त्या उमेदवाराचा निवडून येण्याचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे अन्य कोणत्याही शक्तीचा उपयोग केला तरी 'मतदार' या शक्तीचा वापर केल्या शिवाय पर्यायच नाही.
    "घरात बसू नको रे मतदार, |
        मतदानाचा आज घुमला वारा ||
    मग तु बजाव तुझ्यातल्या मताला |
        आणि निवडून दे उमेदवाराला ||
    तुझ्या मनाला वाटेल त्यालाच मत दे, |
        उमेदवाराला कितीही झेंडा मिरवू दे ||
    तुझे मत हेच तुझ्या आयुष्याची शक्ती |
        तुम्ही-आम्हीच हि आणली की रे युक्ती ||
    उमेदवाराचा तुच की रे आत्मा अससी |
        मग संकटाना तु असा का भुलसी ||
    युवकांच्या अंगातली संचारली कल्पना |
        सर्व देशांनी अवलंबली मतदार प्रदक्षिणा ||
    भारत माता धावून आली तुझ्या आयुषी |
        तरी पण तु बळी पडती ज्ञानाच्या ऋषी ||
    उठा, संघर्ष करत रहा आणि मतदान करा |
        तरच जीवनाचा कळेल अर्थ खरा ||

    आजच्या काळातील उमेदवार हे फक्त निवडून येण्यापुरतेच मतदाराला आशा ठेवायला सांगतात पण हे काय योग्य नाही कारण, सर्व मतदार एकत्र येऊन त्यांची शक्ती एकत्र केली ना या देशातील उमेदवाराला रस्त्या-रस्त्यानी फिरावे लागेल आणि म्हणतील एक-एक मत गोळा करु. जर उमेदवाराला यशस्वी रित्या निवडून यायचे असेल तर प्रत्येक मतदाराला व प्रत्येक मतदाराचे अंतर-मन जिंकावे लागेल तरच यशस्वी उमेदवार निवडून येईल.
    कधीही न संपणा-या शक्तीचा उल्लेख करताना सौर शक्तीचा उल्लेख करतात पण याच बरोबर 'मतदार' या शक्तीचा सुध्दा उल्लेख आपल्याला न संपणार शक्ती मध्ये करावा लागेल. सर्व उमेदवार संपूण गेले तरी, मतदार हा संपणार नाही. मतदान उभारले की उमेदवाराच्या डोळयापुढे फक्त मतदारच उभा राहिला पाहीजे कारण मतदार ही एक अदभुत शक्तीच आहे. ती जपली पाहीजे आणि आजच्या धावपळीच्या काळात वाढीस लावली पाहिजे.

मतदारांना महत्व हेच लोकशाहीचे तत्व

    "लोकांनी लोकांकडून लोककल्याणास्तव चालवलेले राज्य म्हणजे 'लोकशाही' होय". लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी जनतेद्वारे निवडले जातात. सामान्य जनताच एका लोकशाही देशामध्ये सत्तांतर करु शकते. त्यामुळे, या सामान्य जनतेचे मतदाराच्या रुपात लोकशाहीमध्ये खूप महत्तव असते. आपला 'भारत' देश लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे, साहजिकच येथे मतदारांच्या निर्णयावरच सत्ता अवलंबून असते. मग त्यापुढे निसर्गाचेही काही चालु शकत नाही.
                "मतदारांना महत्व,
                हेच लोकशाहीचे तत्त्व."
      असे म्हणने वावगे ठरणार नाही. निवडणुकांच्या काळात या मध्यमवर्गीय सामान्य माणसांना 'मतदारराजा' म्हणून संबोधले जाते. परंतु, माझ्या निदर्शनास असे आले आहे की, आपण ज्यांना 'मतदारराजा' म्हणून संबोधतो, तेच लोक पैश्यांच्या पुडक्यांपुढे नतमस्तक होऊन अयोग्य व्यक्तींची सत्ताधारी म्हणून निवड करतात. त्यामुळे, या विधानावरून मतदारांच्या लोकशाहीतील महत्तवाबाबत शंका उपस्थित होते.
        "खर तर, निवडणुक ही पुर्णपणे निरपेक्षरीतीने व्हायला हवी. परंतु, मतदारांचा अशिक्षितपणा, त्यांचा लोकशाहीवरील नसलेला अथवा उडालेला विश्वास येथे आड येतो. तसेच सुशिक्षित मतदारही पैश्यांच्या  अमिषाला बळी पडून आपले बहुमुल्य मत गुणहीन व्यक्तीला देतात. त्यामुळे परिणामी देशाचा सर्वांगीन विकास साधणे अवघड होऊन जाते."
      "मतदारांच्या विकासासाठी आश्वसनांची खैरात करणारी नेतेमंडळी विजयी झाल्यानंतर मतदारांच्या मतदारसंघाकडे पाहतही नाहीत. परिणामत: मतदारांचा निवडणुंकावरील विश्वास उडतो व ते भ्रष्ट मार्गाने मतदान करण्यास सुरुवात करतात. मतदान पुर्णपणे निरपेक्ष व्हावे, यासाठी शासनाने आजपर्यंत विविध योजना राबविल्या परंतु, त्याचा अद्यापही कोणताही चांगला परिणाम झाला नाही. मुख्यत: भारतातील निवडणुक पध्दत ही योग्य नाही. अक्षरओळख नसलेल्या व्यक्तीला नुसत्या पैश्यांच्या आधारावर उमेदवारी दिली जाते परिणामत: ती व्यक्ती नंतर विकास साधण्यास अपात्र ठरते."
         'खरे पाहता, मतदारांनी आपल्या योग्य विचारांनी योग्य व्यक्तीची निवड सत्ता आणण्यासाठी करावी आणि विकासाची कास धरुन, भ्रष्टाचारावर प्रहार करुन मतदारांनी आपल्या प्रतिनिधीची निवड करावी. आज आपण पाहतो, राजकारण हे संपूर्णपणे आर्थिक सुबत्तेसाठी चालु आहे. येथे सामान्य माणसाचा विकास दुर्लक्षित झालेला आहे.'
         "आपल्या देशात ग्रामपंचायतींपासून ते विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुका जनतेच्या अनमोल मताने होतात. त्यामुळे, मतदारानेही कोणत्याही भुलथापांना अथवा अमिषाला बळी न पडता आपले बहुमुल्य मत एका पात्र व्यक्तीस अथवा पक्षास देऊन विकासाच्या प्रवाहात हातभर लावावा अशी माझी अपेक्षा आहे."
        'भारताच्या लोकसंख्येचा विचार करता, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. तेव्‍हा या लोकशाहीला आणखीन बलवान करण्यासाठी मतदारांचे महत्त्व ही तितकेच आहे. मतदारांनी दुरदृष्टी बाळगुन आपले अमोल मत एका जनहित पाहणा-या व्यक्तीला दयावे व विकासाचा पाया रचावा.'
"अमुल्य मत,
 योग्य पारख,
 हीच आहे,
 मतदाराची ओळख!"
'मतदारांनी आपल्या योग्य आचरणेतुन योग्य व्यक्तीची पारख सत्तेसाठी करावी आणि 'एक हितचिंतक देश जनतेचा' अशी ओळख आपल्या भारताची जगात करुन दयावी. उमेदवाराची निवड करताना त्याची 'शैक्षणिक पात्रता' पाहुन त्याच्यासाठी योग्य असे खाते त्याला दयावे. उदाहरणार्थ, एका 'अर्थशास्त्रज्ञ' उमेदवाराला 'अर्थमंत्री' हे खाते दयावे. असे मला मनोमन वाटते.'
'आपल्या या सर्व वर्तणुकीतून भारत हा निवडप्रक्रियेमध्ये अग्रेसर देश आहे तसेच यामुळेच आपली लोकशाही टिकून आहे हे सा-या विश्वाच्या निदर्शनास आणावे अशी इच्छा आहे. ' म्हणुनच म्हणतो.
            "मतदारराजा जागा हो,
             तेव्हाच म्हण, जय हो !
मतदाराची हीच शक्ती भारताचा सर्वांगीण विकास घडवु शकते.


-    जिल्हा माहिती कार्यालय
    सोलापूर
 
Top