उस्मानाबाद -: बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना.त्रिपाठी हे दि. २९ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादिवशी सकाळी त्यांचे उस्मानाबाद येथे आगमन होणार असून सकाळी ११ वाजता बालमेळावा व बाल पंचायत आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसह ते चर्चा करणार आहेत. तसेच दुपारी ३ वाजता  बालकांचे लैंगिक शोषन प्रतिबंधक कायदा-२०१२, मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा-2009 यावर कार्यवाही करण्याबाबत जिल्ह्यातील कामगार अधिकारी, शिक्षणाधिकारी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण),पोलीस अधिकारी तसेच या क्षेत्रातील इतर अधिकारी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्याबरोबर जनसुनावणी कार्यक्‌रमास उपस्थिती व त्यानंतर मुक्काम.
दि.30 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथून सोलापूरकडे प्रयाण.
 
Top