उस्मानाबाद -: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सर्कीट हाऊस शिंगोलीपर्यत फौजदारी  प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि. २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते दि. २६ जानेवारी रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत  प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
       या आदेशान्वये श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सर्कीट हाऊस शिंगोली या मार्गावर धरणे,उपोषण, ध्वनिक्षेपकाचा वापर,मोर्चा आदि आंदोलनात्मक कार्यक्‌रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. पर्यत                                           
 
Top