नळदुर्ग -: समाजात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवून व सामाजिक सलोखा राखण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍नशील राहणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्‍ठा घारगे यांनी केले.
     नळदुर्ग येथे महाराष्‍ट्र बहुजन पत्रकार संघ तुळजापूर तालुका दिनदर्शिकेचे प्रकाशन घारगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या की, फुले-शाहू-आंबेडकर यांच्‍या पूर्वगामी विचारांचे महाराष्‍ट्र राज्‍य असून पत्रकारानी शहनिशा करुनच वृत्‍त प्रसिध्‍द करावे. जेणेकरुन सामाजिक शांतता व सुव्‍यवस्‍थेला तडा जावू नये, याची काळजी घेण्‍याचे त्‍यानी शेवटी सांगितले.
     कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी, पत्रकार मिहीर थत्‍ते, सामाजिक परिवर्तनचे मारुती बनसोडे, गुणवंत सोनवणे, निलकंठ इटकरी, अमोल पाटील, नगरसेवक दयानंद बनसोडे, विठ्ठल बनसोडे, दयानंद काळुंके, मारुती खारवे, उत्‍तम बनजगोळे, इरफान काझी, सोमनाथ बनसोडे, आर.एस. गायकवाड आदीजण उपस्थित होते. यावेळी अनेकानी आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक एस.के. गायकवाड तर सु्त्रसंचालन भैरवनाथ कानडे यानी केले. आभार महाराष्‍ट्र बहुजन पत्रकार संघ तुळजापूर तालुकाध्‍यक्ष दादासाहेब बनसोडे यांनी केले.
 
Top