'तुळजापूर लाईव्‍ह' वर दि. ४ डिसेंबर २०१२ रोजी पासुन सारा किरवे यांच्‍या वात्रटिका (सारांश व सारा-सार) प्रसिध्‍द करण्‍यात येत असून सदरील सदर प्रसिध्‍द करण्‍यामागचा आमचा हेतू केवळ वाचकासाठी आहे. प्रसिध्‍द झालेल्‍या संबंधित वात्रटिका सारा किरवे यांच्‍या फेसबुकवरुन घेण्‍यात आले आहे. वात्रटिकेच्‍या माध्‍यमातून आमचे कुणाच्‍याही धार्मिक भावना दुखावण्‍याचा उद्देश नाही आणि गैरप्रकार किंवा कुणाच्‍या भावना दुखावतील असे मजकूर, वात्रटिका आम्‍ही प्रसिध्‍द केले नाही आणि करणारही नाही. आम्‍हाला सर्व धर्मांचे नितांत आदर असून सदरील वात्रटिका तुळजापूर लाईव्‍ह फेसबुक अकाऊंटला टॅग मारुन शेअर केले जात होते. यापुढे संबंधितानी टॅग मारु नये, अशी विनंती करण्‍यात येत आहे.
     तसेच 'तुळजापूर लाईव्‍ह' या फेसबुकवरून इतर कोणीही टॅग मारून किंवा कुठल्‍याही गैर मजुकराबद्दल व प्रतिमा, फोटो बद्दल तुळजापूर लाईव्‍ह किंवा संचालक कायदेशीररित्‍या जबाबदार असणार नाही किंवा जबाबदारी स्विकारणार नाही ! ही सूचना वजा इशारा नसून कायदेशीर नोटीस समजण्‍यात यावी, असे मजकूर दि. ४ डिसेंबर २०१२ रोजी फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहे. तरीही वात्रटिकेमुळे किंवा गैरसमजातून कुणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील तर आम्‍ही तुळजापूर लाईव्‍ह परिवाराच्‍यावतीने दिलगिर आहोत. यापुढे विशेष खबरदारी घेतली जाईल. आम्‍हाला वाचकानी दि. 23 जानेवारी रोजी वात्रटिकाबाबत माहिती दिल्‍याबद्दल आम्‍ही त्‍यांचे ऋणी आहोत. धन्‍यवाद !
 
संपादक
तुळजापूर लाईव्‍ह
 
Top