न्यूयॉर्क :- लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल' ने आता पासवर्ड 'डिलीट' करण्याचे ठरविले आहे. येत्या काही महिन्यात याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता 'तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात का' असा 'एफएक्यू' तुमच्या कॉम्प्युटरच येणार नाही. गुगलच्या सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष एरिक ग्रोस आणि अभियंता मयंक उपाध्याय या दुकलीने 'आयईईई सेक्युरिटी अँड प्रायव्हसी' या मासिकात लिहिलेल्या या सदंर्भातील लेखात याविषयी अधिक माहिती वाचायला मिळणार आहे. नेटचा वापर सातत्याने करणा-यांचे पासवर्ड हॅक होण्याचे तसेच त्यांच्या महत्त्वाच्या माहितीवर हल्ला होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यात अनेकांना अपयश आले आहे. त्यावर तोडगा म्हणूनच गुगलने आता पासवर्डऐवजी 'फिजिकल की' चा वापर करण्याचे ठरवले आहे. नेट वापरणा-याने त्याच्याकडील छोटासा युएसबी कॉम्प्युटरमध्ये लावायचा म्हणजे त्याचे लॉगईन होईल. त्याला पासवर्ड टाकावा लागणार नाही. अशीच यंत्रणा तुम्ही तुमच्या अंगठीवर, चेनवर किंवा चावीवरही बसवू शकणार आहात. म्हणजे त्यावर एक मायक्रोचीप टाकली जाईल. तीत तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती असेल व तीच तुमचा 'पासवर्ड' असेल. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरवर लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज भासणार नाही.
* सौजन्य पुढारी