उस्मानाबाद -: खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्याची सर्व भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध साधनसंपत्ती विचारात घेता कोणती विकासाची कामे करणे गरजेचे आहे, याबाबत मतदार संघातील नागरिकांकडून कल्पना जाणून घेवून त्यापैकी अभिनव कल्पना सुचविणा-या नागरीकांना वन एमपी वन आयडीया पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सुचविण्यात येणा-या कामांबाबत चा अभिनव शीलतेला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने या पुरस्काराची सुरुवात केली असून यात नागरीकांना शिक्षण, पायाभूत कौशल्य, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण व पायाभूत सुविधा, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील विकास कामांबाबत अभिनव कल्पना सूचविणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरीक व्यक्तीश: अथवा कोणतीही स्वयंसेवी संस्था, उद्योग समुह अथवा फेडरेशन, शिक्षणसमुह अथवा जिल्ह्यातील कोणतीही संस्था, संघटना विकासाबबातची अभिनव कल्पना एक महिन्यात सूचवू शकेल.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यानंतर ही समिती प्रथम तीन बक्षिसपात्र संकल्पनांची घोषणा करणार आहे. या समितीत अभियांत्रिकी, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, उद्योग, बॅंकींग आदी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
बक्षीसपात्र प्रथम तीन संकल्पनांना अनुक्रमे अडीच लाख, दीड लाख आणि एक लाख रुपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. सदर माहिती जिल्ह्याच्या www.osmanabad.nic या संकेतस्थळावर उपलब्ध असून सविस्तर तपशिलासाठी www. mplads.nic.in हे संकेतस्थळ पहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले आहे.