उस्मानाबाद -: राज्यातील ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाच्या अध्यक्ष या पदासाठी केवळ कार्यरत असलेले जिल्हा न्यायाधिश किंवा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश यांच्यासाठी १३ पदे नियुक्तीने भरण्यात येणार आहे. तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद कार्यालयाच्या अन्यायीक सदस्य या पदाच्या नियुक्ती/ पुर्ननियुक्तीने जागा भरणे तसेच राज्यातील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग या कार्यालयाच्या न्यायीक सदस्य या पदाच्या नियुक्तीने जागा भरण्यात येणार आहे.
          इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत. 
 
Top