उस्मानाबाद -: शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत ठाणबंध शेळी-मेंढी पालनाव्दारे पुरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी (१०+१) शेळी गट वाटप अंमलबजावणीसाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीची बैठक येथे ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे होत असून यावेळी चिठ्ठ्या टाकून सोडत पध्दतीने लकी (ड्राव्दारे) लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यावेळी हजर राहण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी केले आहे.