सोलापूर -: जिल्ह्यात राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य झाले आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर ८ जिल्ह्यात सुरु झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत सोलापूर जिल्ह्याने चार हजार तीनशे यशस्वी शस्त्रक्रिया करीत राज्यात ही योजना सुरु असलेल्या जिल्ह्यामधुन व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
आघाडी शासनाने दारिद्रय रेषेखालील किंवा अल्प उत्पन्न गटातील सामान्यातील सामान्य लोकांच्या आरोग्याच्या समस्या सुधाराव्यात, त्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने २ जुलै २०१२ पासुन सोलापूरसह आठ जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अमलबजावणी सुरु केली होती. शासनाच्या या योजनेस सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आपले आरोग्य सुधारावे यासाठी गरीब जनता या योजनेचा खुप मोठया प्रमाणावर लाभ घेत आहे.
दारिद्रय रेषेखालील लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी सुरु केलेल्या या योजनेतंर्गत एकटया सोलापूर जिल्ह्यात २४ जानेवारी २०१३ पर्यंत मोठया व सामान्य स्वरुपाच्या मिळून तब्बल ४ हजार २४१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आज पर्यंत ११ कोटी ५८ लाख ३ हजार ७१० रुपये रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी खर्ची पडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात या योजनेतंर्गत झालेल्या शस्त्रक्रियेपैकी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या व मोठया स्वरुपाच्य असणा-या हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, शरीरातील उर्त्सजन संस्थेशी निगडीत असणा-या शस्त्रक्रिया, अपघात दुर्घटनेच्या शस्त्रक्रिया, किडनीशी संबंधित शस्त्रक्रिया, सामान्य स्वरुपाच्या शस्त्रक्रिया आणि विविध रुग्णांवर कर्करोगाशी निगडीत आणि व तात्काळ औषधोपचारांतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
दारिद्रयाने पछाडलेल्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने एका खाजगी विमा कंपनीच्या मदतीने ही योजना पहिल्या टप्प्यात यशस्वीरित्या राबविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरात या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळत असून जिल्ह्याने चांगले काम करुन राज्यात व्दितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे