उस्मानाबाद -: सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकासाठी त्यांच्या पात्रते प्रमाणे कमीत-कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अगिकृत महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाद्वारे ( मेस्को ) संचलित, मेस्को करीअर अँकंडमी, करंजे नाका, सातारा येथे कार्यरत आहे. सैन्य व पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी ३० दिवसाचे भरतीपुर्व प्रशिक्षणाचे आयोजित केलेले आहे. त्याचे निवास व भोजनासह एकूण प्रशिक्षण शुल्क रक्कम रुपये ६ हजार एवढे आहे. प्रशिक्षण वर्ग ३१ जानेवारी पासून सुरु होणार आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील उमेदवारांची निवड चाचणी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सैनिक मुलांचे वसतिगृह, अंबाजोगाई रोड, मेडिकल कॉलेज समोर, लातुर येथे घेण्यात येणार आहे.
वरील प्रशिक्षण समाजातील सर्वासाठी उपलब्ध असुन उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २५ जानेवारीला लातुर येथे उपस्थित रहावे. निवड चाचणीसाठी येताना उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणापत्रिकासह हजर राहुन या योजनेचा लाभ घ्यावा. चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. निर्धारित शुल्कापैकी दोनशे रुपये लगेच भरुन त्यांनी शिबीरातील आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी केलेले आहे.

सेवानिवृत्त सैनिकांना पेन्शनबाबत सूचना
उस्मानाबाद -: जिल्हयातील जे माजी सैनिक सन 1986 पुर्वी सैन्यातून सेवानिवृत झाले आहेत व पेन्शन धारक आहेत. परंतू त्यांनी अद्याप त्यांच्या पत्नीचे नाव कुटुंबनिवृत्तीवेतनासाठी लावले नाही, अशा सर्व माजी सैनिकांनी त्यांच्या पत्नीचे नाव पेंन्शनसाठी लावावे जेणेकरुन त्यांच्या नंतर पत्नीस त्वरीत पेन्शन मिळेल. याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून फॉर्म घेऊन ते भरुन संबंधित अभिलेख कार्यालयास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद मार्फत पाठविणे जरुरी आहे. तरी अशा माजी सैनिकांनी सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
माजी सैनिकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन
उस्मानाबाद -: जिल्हयातील माजी सैनिक, सैनिकाच्या विधवा पत्नी, कुटुंबिंयाना सहाव्य वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे सुधारीत मुळ अतिरिक्त निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती देण्यात येणार आहे. ज्यांचे वय ८० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या पात्र सैनिकांनी पीपीओ, डिसचार्ज बुक, जन्मदिनांक नमुद नसल्यास शपथपत्राचा नमुना भरुन बँकेला सादर करावा.
ज्यांचे वय ८० वर्षापेक्षा जास्त परंतु ८५ पेक्षा कमी असलेल्यांना २० टक्के मुळ निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेन, ८५ वयापेक्षा जास्त परंतु ९० पेक्षा कमी असलेल्या ३० टक्के, ९० वक्ष व त्यापेक्षा जास्त परंतु ९५ पेक्षा कमी असलेल्यांना ४० टक्के, ज्यांचे वय ९५ पेक्षा जास्त परंतु १०० पेक्षा कमी असलेल्यांना ५० टक्के, आणि त्यांचे वय १०० पेक्षा जास्त असेल अशांना १०० टक्के अतिरिक्तेमुळे निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन सहाव्या वेतन आयोगातील सुधारीत मुळ अतिरिक्त निवृत्तीवेतन, कुंटुंब निवृत्तीवेतनाची मागणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.