मुंबई -: महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे प्रकाशित करण्यात येणारी डिरेक्टरी सामान्यांना उपयुक्त असून ही डिरेक्टरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी आज येथे केली.
मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्य सचिवांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या `महाराष्ट्र अमुचा डिरेक्टरी-2013` चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य सचिव म्हणाले की, दरवर्षी महासंघातर्फे सामान्यांना उपयुक्त ठरणारी ही डिरेक्टरी प्रकाशित करण्यात येते. हा अभिनंदनीय उपक्रम आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अनेक विभागांची कार्यालये मंत्रालयाबाहेर कार्यान्वित झाली आहेत. या डिरेक्टरीतील प्रत्येक विभागाच्या कार्यालयांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांकाची माहिती सामान्यांना उपयुक्त ठरणारी आहे. ही डिरेक्टरी वेबसाईटवर टाकल्यास त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल, असेही श्री. बाँठिया यांनी सांगितले.
महासंघाचे सरचिटणीस ग.दी. कुलथे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष रवींद्र धोंगडे, महिला सरचिटणीस सोनल स्मितपाटील, श्रद्धा बेलसरे, मीना आहेर, राज्य संघटक रमेश जंजाळ, समीर भाटकर, डॉ. एस. एम. पाटील, एस. के. भोरखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र अमुचा या 160 पानी डिरेक्टरीमध्ये केंद्र शासनातील महत्त्वाची कार्यालये, राज्यपाल, उच्च न्यायालय, राज्य मंत्रिमंडळ, विधान मंडळ सचिवालय, विविध विभागांचे सचिव, मंत्रालयातील सर्व विभागांचे सहसचिव, माहिती आयुक्त, अन्य राज्यांचे मुख्य माहिती आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आदींच्या कार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक आणि शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश आहे.