सोलापूर -: सोलापूरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. प्रविण गेडाम यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकरला.
     याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, विविध उपजिल्हाधिकारी, महसुल विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    तसेच याप्रसंगी डॉ. गेडाम यांनी पत्रकारांशीही संवाद साधुन जिल्ह्यातील टंचाईच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. डॉ. गेडाम हे २००२ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असून येथे येण्यापूर्वी ते पुणे येथे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते.

 
Top