नळदुर्ग (भैरवनाथ कानडे)  -:  'तुळजापूर लाईव्‍ह' ऑनलाईन ई-न्‍यूज पेपरच्‍या प्रथम वार्षिक दिन‍दर्शिकेत पर्यावरण जाणीवजागृती, स्‍त्रीभ्रुणहत्‍या, पाणीटंचाई निवारणासंबंधी उदभबोधनपर संदेश देण्‍यात आला असून शिवाय उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्‍कृतिक व साहित्‍य क्षेत्रामध्‍ये वेगळा ठसा निर्माण केलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या स्‍मृतीना उजाळा देण्‍यात आला आहे. समाज प्रबोधनाच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक बाबींची विशेष नोंद या दिनदर्शिकेमध्‍ये घेतल्‍यामुळे ही दिनदर्शिका विधायक कार्यासाठी नक्‍कीच उपयोगी ठरणार असल्‍याचे मत श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन सुनीलराव चव्‍हाण यांनी व्‍यक्‍त केले.
    'तुळजापूर लाईव्‍ह' च्‍यावतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या प्रथम वार्षिक दिनदर्शिका २०१३ चे प्रकाशन सोहळा श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन सुनीलराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते मोठ्या थाटात करण्‍यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणून तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्‍हाण, माजी सभापती बालाजी मोकाशे, कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष संजय दळवी, श्री कुलस्‍वामिनी सुतगिरणीचे कार्यकारी संचालक के.के.लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     कार्यक्रमाच्‍या प्रारंभी 'तुळजापूर लाईव्‍ह' चे मुख्‍य संपादक शिवाजी नाईक यांनी सुनीलराव चव्‍हाण यांचा शाल, पुष्‍पहार, पुष्‍पगुच्‍छ देऊन सत्‍कार केला. त्‍याचबरोबर उपस्थितांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर तुळजापूर लाईव्‍ह दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात व थाटयाने संपन्‍न झाला. समाजाला दिशा देण्‍याचे स्‍तुत्‍य उपक्रम दिनदर्शिकेच्‍या माध्‍यमातून संपादक शिवाजी नाईक यानी वेगळ्या पध्‍दतीने करीत असल्‍याचे कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांनी सांगून अभिनंदन केले. तर अनेकानी अभिनंदनाचा वर्षाव करुन कौतुक केले.
      या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यास कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी, युवक कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष बसवराज धरणे, जिल्‍हापरिषद शिक्षण समितीचे माजी सदस्‍य अविनाश मोकाशे, माजी जिल्‍हा प्रसिध्‍दी प्रमुख दत्‍तात्रय वाघमारे, तुळजापूर लाईव्‍हचे संचालक विकास नाईक, दादासाहेब बनसोडे, दयानंद काळुंके, सतीश राठोड, सोमनाथ बनसोडे, प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.
 
Top