जयपूर -: सध्या जयपूरमध्ये साहित्य संमेलन होत असून, हे संमेलन साहित्यापेक्षा वादग्रस्त चर्चांनी नेहमी गाजते. आता एक असाच वाद तयार झाला आहे. समाजशास्त्रज्ञ व पॉलिटिकल साइकोलॉजिस्ट आशीष नंदी यांनी शनिवारी एक वादग्रस्त वक्तव्य केले. एससी, एसटी व ओबीसी या मागासवर्गिय समाज भारतात सर्वांधिक भ्रष्टाचार करणा-यांमध्ये पुढे आहे. यांचे उदाहरण देताना त्यांनी मायावतींवर तोफ डागत हेच लोक भ्रष्टाचार पसरवत आहेत, असे वक्तव्य नंदी यांनी केले आहे. दलित आणि मागासवर्गीयांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणा-या आशीष नंदी यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत जयपूरमध्‍ये गुन्‍हा दाखल झाला आहे.
        ओबीसी आणि दलितांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे, असे वादग्रस्‍त वक्तव्य समाजशास्त्रज्ञ आशीष नंदी यांनी जयपूर लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये केले होते. नंदी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून निषेध व्यक्त झाला.  त्यांचावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही जोर धरत होती. त्या पार्शभूमीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. तर नंदी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. मला दलित आणि मागासवर्गींयाबाबत आदर आहे, असे नंदी यांनी स्‍पष्‍टीकरण देताना सांगितले.
        दरम्यान, नंदी यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. देशभरातील दलित नेत्यांनी नंदी यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जयपूर पोलिस नंदी यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. दलित नेते चंद्रभान प्रसाद, रामदास आठवले, उदित राज यांनी नंदींवर सडकून टीका केली आहे.
        आशीष नंदी 'जेएलएफ'च्या तिस-या दिवशी 'रिपब्लिक ऑफ आइडियाज' या चर्चासत्रात पेट्रिक फ्रेंच, तरूण तेजपाल, रिचर्ड सोराबजी आणि आशुतोष कुमार यांच्यासोबत चर्चा करीत होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन उर्वशी बुटालिया करीत होती. नंदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चर्चासत्रात सहभागी झालेले पत्रकार आशुतोष यांनी लागलीच विरोध दर्शिवला.
         भारत देश स्वतंत्र्य झाल्यानंतर झालेली आंदोलने व देशात श्रीमंती-गरीबी यांच्यातील दरी वाढत चालली असल्याची चर्चा सुरु होती. अशीष नंदी यावेळी सांगितले की, भारतात भ्रष्टाचार वाढत चालला आहे व त्यावर अद्याप कोणताही उपाय शोधला नाही. दुसरीकडे, जगभर भ्रष्टाचाराच्या विरोधात तेथील सरकार व लोक उपाय शोधत आहेत. सिंगापूर असा देश आहे तेथे जवळजवळ भ्रष्टाचार संपला असल्याचे म्हणता येईल.
         आशीष नंदींच्या विरोधात गुन्हा - दलितांना भ्रष्ट म्हटल्याने समाजशास्त्रज्ञ नंदींच्या विरोधात राष्ट्रीय मीणा महासभा गुन्हा दाखल करणार आहे. महासभेचे अध्यक्ष रामपाल मीणा यांनी म्हटले आहे की, दलितांच्या विरोधात भाष्य केल्याने अट्रासिटीच्या गुन्ह्यातंर्गत अशोकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत. तसेच गरज पडली तर, नंदी यांच्या तोंडावर काळे फासू.
           80-85 टक्के भारतीयांना शिव्या- जाट महासभेचे अध्यक्ष राजाराम मील यांनी म्हटले आहे की, जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये साहित्यिकांनी दलितांच्या विरोधात गैरउदगार काढू नयेत. देशात दलित व ओबीसींची संख्या 80-85 टक्के इतकी आहे आणि ते कोणत्याही भ्रष्टाचारात अडकले नाहीत. असे वक्तव्य करुन देशातील एवढ्या लोकांना शिव्या देऊ नयेत.
         ७५ वर्षीय आशीष नंदी हे बंगाली खिश्चन कुटुंबातील असून, प्रसिद्ध पत्रकार लेखक प्रितीश नंदी यांचे थोरले बंधू आहेत.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top