उस्मानाबाद -: विशेष सहाय्य योजना कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबगाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ( राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना) अशा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. आता या योजनेसाठी लाभ घेत असलेल्या व घेवू इच्छिणा-या लाभार्थ्यांनी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधारकार्डाची नोंदणी केली नसेल अशा लाभार्थ्यांनी दि. १० ते २० जानेवारी या कालावधीत पंचायत समीती सभागृह, तुळजापूर व नगरपरीषद नळदुर्ग येथे आधार कार्डाची नोंदणी करुन घ्यावी व आधार कार्ड प्राप्त होताच त्यांची छायाप्रत तहसील कार्यालयास दाखल करावी, असे आवाहन तुळजापूरचे  तहसीलदार व्ही.एल.कोळी यांनी  केले आहे.       
 
Top