उस्मानाबाद -: जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक होणार असून त्यासाठीची प्राथमिक मतदार यादी  प्रसिध्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे यांनी कळविले आहे.ही मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सर्व  नगरपालिकांच्या सूचना फलकावर नागरीकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीबाबत कोणास आक्षेप अथवा हरकत घ्यावयाची असेल त्यांनी आपले अर्ज ९ जानेवारीपर्यंत दोन प्रतीत योग्य त्या पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग,उस्मानाबाद यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम  १९९८ चे कलम ३ च्या पोटकलम (३) तरतुदीनुसार जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या निवडी करण्यात येणार आहे. यानुसार नगर परिषद पदांवर (लहान नागरी निर्वाचन क्षेत्र) व जिल्हा परिषद पदांवर (ग्रामीण  निर्वाचन क्षेत्र) निवडणू आलेल्या सदस्यांच्या नावाची प्राथमिक मतदार यादी ७ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
 
Top