उस्मानाबाद -: पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  कळंब येथील शुभमंगल कार्यालय मोहारोड, येथे दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामकाजासंदर्भात  आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
          या बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्‍यक्ष, जिल्हाधिकारी, जि.प. न.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच पाणीटंचाई व महात्मा गाधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंबंधी सर्व तालुकास्तरीय अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कळंबचे तहसीलदार व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी केले आहे.

 
Top