सोलापूर :- बालकामगार प्रकल्पातील बालकामगार विद्यार्थ्यांचा कलाविष्कार हा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात प्रकल्पातील विद्यार्थी त्यांच्यातील कलागुण सादर करतील.
या कलाविष्कार कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव तसेच निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण उपस्थित राहणार आहेत.