बार्शी -: नोव्‍हेंबर महिन्‍यात घेण्‍यात आलेल्‍या सी.ए. परीक्षेत बार्शीतील पाच मुला,मुलींनी घवघवीत यश संपादन केले. या यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा बी.एन. क्‍लासेसच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला.
     इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊन्‍ट ऑफ इंडियाच्‍यावतीने नोव्‍हेंबर २०१२ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या सीए च्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण झालेले पाचही विद्यार्थी बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधील उच्‍च माध्‍यमिक व्‍यवसाय अभ्‍यासक्रमामधील अकौन्टिंग अँन्‍ड ऑडिटिंग विभागात शिक्षण घेतलेले आहेत. यश संपादन केलेल्‍या मोहसीन सिकंदर शेख, शेखर मस्‍के, श्रद्धा दशरथ वायचळ, सूरज जुगल, किशोर जाजू या विद्यार्थ्‍यांचा बी.एन. क्‍लोससच्‍या हॉलमध्‍ये बार्शी प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष सचिन वायकुळे यांच्‍या हस्‍ते व नायब तहसिलदार धिरज मांजंरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सत्‍कार करण्‍यात आला. क्‍लासचे प्रमुख सुरेश बागल यांनी या सत्‍कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्‍तीर्ण झालेले विद्यार्थी बी.एन. क्‍लासचे माजी विद्यार्थी आहेत. सत्‍कारमूर्ती शेखर मस्‍के, मोहसीन शेख तसेच श्रध्‍दा वायचळ यांचे वडील यांनी यावेळी मनोगत व्‍यक्‍त केले. बार्शी प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष सचिन वायकुळे, नायब तहसिलदार धिरज मांजरे, सुरेश बागली यांनीही विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशाल गरड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी अमित देशमुख, सुशील कोळेकर यांच्‍यासह सर्व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

 
Top