सोलापूर : येथील जिल्हा माहिती कार्यालयातील वाहन चालक मधुकर शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.
    यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शिंदे यांनी त्यांच्या ३८ वर्ष ६ महिन्याच्या सेवेच्या कालखंडात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली असून शेवटच्या दिवशीही ते कार्यरत राहिले यातच त्यांची कामसु वृत्ती दिसुन येते. तर जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांनी  शिंदे हे विभागात सर्वाधिक सेवेचा कालखंड उपभोगलेले वाहन चालक असून त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कर्तव्याला प्राधान्य दिल्याचे सांगुन कार्यालयाच्या वतीने त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी माहिती सहाय्यक फारुक बागवान, निवृत्त दुमुचा दिलीप घारगे (सांगली) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी  माहिती सहाय्यक रुपाली गोरे, नितिन पवार, सचिन बहुलेकर, ज्ञानेश्वर कोकणे, विजयकुमार साबळे, संजय घोडके, भाऊसाहेब चोरमले, इक्बाल भाईजान, मनिषा लकडे, प्रविण पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
 
Top