उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे शनिवार, दि. २ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
       सकाळी ८-१५ वाजता कुर्डुवाडीहून पळसप, ता. उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी १० वाजता पळसप येथे आगमन व सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्व. वसंतराव काळे स्मृतिदिनानिमित्त आयोजित एक दिवसीय दुस-या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनास उपस्थिती. दुपारी १-३० वा. मोटारीने वाठवडा ता.कळंबकडे प्रयाण. 1-४० वा. वाठवडा येथे आगमन व श्रीदत्त साईमंदिर ट्रस्ट येथे सदिच्छा भेट. दु.२ वा. डोमगाव, ता. परंडाकडे प्रयाण. दु. ३-१५ वा. डोमगाव येथे आगमन व तेथील बोटींग क्लब व सभागृहाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६ वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.         
 
Top