उस्मानाबाद :- केंद्र पुरस्कृत वैरण विकास योजनेअंतर्गत  हस्तचलीत व विद्युत चलीत कडबाकुटटी यंत्राच्या वापरास  प्रोत्साहन  मिळावे, यासाठी साहित्य वाटप  अंमलबजावणीसाठी समिती गठीत केली आहे. या समितीची बैठक कुक्कुट प्रकल्प, उस्मानाबाद येथे  एक फेब्रुवारी रोजी सकाळी 11-30 वाजता होत असून यावेळी चिठ्ठ्या  टाकून सोडत पध्दतीने लकी (ड्राव्दारे) लाभार्थ्यांची निवड  करण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यावेळी हजर राहण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी केले आहे.   
 
Top