बार्शी -: येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्‍या अंतर्गत रामभाई शहा रक्‍तपेढी असून सदरच्‍या ठिकाणी उपाध्‍यक्ष पदावरील असलेल्‍या कुंकूलोळ यांनी जीवनज्‍योत संघटनेच्‍यावतीने दि. २५ मार्च २०१२ रोजी लकी ड्रॉ ठेवून रक्‍ताची गैरमार्गाने विल्‍हेवाट लावल्‍याचा आरोप योगेश लोखंडे यांनी केला आहे. सदरच्‍या बाबत अनेक वेळा मागणी करुनही योग्‍य ती कारवाई न झाल्‍याने लोखंडे यांनी दि. २५ जानेवारी रोजीपासून आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणानंतर चौथ्‍या दिवशी रक्‍तपेढीच्‍या संचालकानी आठ दिवसात चौकशी करण्‍याचे आदेश करुन जिल्‍हाधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिल्‍याने लोखंडे यांनी उपोषण मागे घेतले.
 
Top