उस्मानाबाद -: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व के. ए. तडवी, तहसीलदार श्रीमती मेने व आर.जी. मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.