मुंबई -: देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार दि. ३० जानेवारी रोजी  हुतात्मा दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांत तसेच सर्व नागरिकांनी सकाळी ११ वाजता २ मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, असे आवाहन शासनाने केले आहे.
    संपूर्ण देशभर हुतात्मा दिनी २ मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. उद्या सकाळी ११ वाजता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था. विद्यापीठे यामधील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी व सर्व नागरिकांनी  दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली  वाहण्यात यावी. मौन पाळण्याची सुरूवात होण्यापूर्वी सकाळी १०.५९ मिनिटांपासून ११ वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल. भोंगा संपल्यानंतर २ मिनिटांचे मौन पाळण्यात यावे. त्यानंतर इशारा भोंगा वाजविल्यानंतर मौन सोडावे.
     ज्या ठिकाणी इशारा भोंग्याची सोय नसेल त्याठिकाणी ठीक वाजता दोन मिनिटांसाठी मौन पाळावे, असेही  शासनाने सूचित केले आहे.
 
Top