सोलापूर : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते बाल कामगार प्रकल्पाद्वारे आयोजित बाल कामगार क्रिडा स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सुशिलकुमार शिंदे शारिरीक शिक्षण महाविद्यालय प्रांगणात पार पडला.
    स्पर्धेत घेण्यात आलेल्या सहा वैयक्तिक आणि तीन सांघीक क्रिडा प्रकारांमध्ये बाल कामगार प्रकल्पातील ९ ते १४ वयोगटातील ६५० मुला-मुलींनी आपला सहभाग नोंदवला होता. तर शिक्षकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी मुलांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी या प्रकल्पास शुभेच्छा देऊन येथील विद्यार्थ्यांच्या क्रिडागुणांचे कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली. प्रकल्प संचालीका तसेच येथील शिक्षकांच्या मेहनतीचे आणि एकूणच त्यांच्याकडून पार पाडल्या जात असणा-या चांगल्या जबाबदारीबद्दल आभार मानले. 
    प्रकल्प संचालीका अपर्णा कांबळे यांनी या प्रकल्पाची व घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धांची माहिती आपल्या भाषणातून दिली.
    कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे,  मगर आणि बाल कामगार प्रकल्पातील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top