मगर प्रतिक रावसाहेब
नळदुर्ग -: कोकणातील सिंधुदुर्ग येथे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेमध्‍ये माध्‍यमिक आश्रमशाळा, वसंतनगर (नळदुर्ग) येथील मगर प्रतिक रावसाहेब या विद्यार्थ्‍यांने 69 किलो वजन गटामध्‍ये प्रथम क्रमांक पटकाविले आहे. त्‍यामुळे हरियाणा राज्‍यातील रोहतक या ठिकाणी होणा-या  राष्ट्रीय कुस्‍ती स्‍पर्धेसाठी त्‍याची निवड झाली आहे.
       नळदुर्ग (वसंतनगर) येथील नाईक मागास समाज सेवा मंडळ संचलित माध्‍यमिक आश्रमशाळेत इयत्‍ता नववीच्‍या वर्गात शिक्षण घेणारा मगर प्रतिक रावसाहेब याने 69 किलो गटात सिंधुदुर्ग येथे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेत (पायका ग्रामीण) प्रथम क्रमांक मिळविले आहे. या स्‍पर्धेत 150 स्‍पर्धक सहभागी झाले होते. मगर प्रतिक यास त्‍याचे वडील महाराष्‍ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी विभागीय कुस्‍ती स्‍पर्धा दि. 12 डिसेंबर रोजी पुणे येथे होऊन त्‍याची निवड राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेसाठी झाली होती. त्‍याच्‍या यशाबद्दल तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन सुनील चव्‍हाण, संस्‍थेचे अध्‍यक्ष वैभव जाधव, उपाध्‍यक्ष विशाल जाधव, मुख्‍याध्‍यापक जे.एन. लाटे, प्राथमिक मुख्‍याध्‍यापक जाधव जे.डी., सहशिक्षक सुनिल उकंडे, श्रीराम राठोड व शाळेच्‍या कर्मचा-यांनी त्‍याचे अभिनंदन केले आहे.
 
Top