नळदुर्ग -: आजच्या पिढीवर संस्कार करणे गरजेचे झाले असून संस्काराविना आजचा युवक भरकटत चालला आहे, असे प्रतिपादन प्रा.एल.बी. बिराजदार यांनी केले.
आज नळदुर्ग येथे दि. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदाचा जन्म दिवस युवक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद शतकोत्तर सुवर्ण जयंती समारोह समितीच्यावतीने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. लोकमान्य वाचनालयाच्या प्रांगणात विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा कॉंग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष संजय दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. येथून ही शोभा यात्रा निघुन भ्ज्ञवानी चौक, ब्राह्मण गल्ली, संभाजी चौक, मराठा गल्ली, किल्ला गेट, क्रांती चौक मार्गे चावडी चौक येथे विसर्जित करण्यात आली.
यावेळी मल्लिकार्जून मंदीर सभागृहात प्रकट मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून जवाहर महाविद्यालयाचे प्राध्यापक एम.बी. बिराजदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक सुर्यकांत पाटील, देवेंद्र घुगे, मुख्याध्यापक महेश घंटे, जितेंद्र मोरखंडीकर, गायकवाड, माळगे मॅडम, जाधवर, कुसुमकर, तांबे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. बिराजदार म्हणाले की, घराघरातून आज पाल्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे झाले आहे. संस्काराविना आजची पिढी अधोगतीकडे जात आहे. आजचा तरूण चरित्रशिल झाल्या शिवाय चांगल्या समाजाची निर्मितीही होणार नाही व पर्यायाने देशाची प्रगतीही खुंटेल. स्वामी विवेकानंदाने जगाला भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले असून आज मात्र आपल्यावर पाशच्यात संस्कृतीचा मारा होत आहे. काय घ्यायचे काय न घ्यायचे हे आपण आज ठरवले पाहिजे. दुरचित्र वाणीच्या वाढत्या व्याभिचरामुळे आजचा समाज वेगळया मार्गाकडे जात आहे व अशा परिस्थितीत युवकाकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ मिळत नसल्याने देशाला दिल्ली सारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. आपली संस्कृती ही जगात महान असून त्याचे आचरणच देशाला येणा-या संकटातून वाचवू शकेल, असे मत प्रा. बिराजदार यांनी व्यक्त केले.
यावेळी देवेंद्र घुगे यांनी ही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक नगरसेवक संजय बताले तर सुत्रसंचालन सुधीर पोतदार यांनी केले तर आभार सुशांत भुमकर यांनी मानले. यावेळी नगरसवेक कमलाकर चव्हाण, शिवसेना तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, स्वामी समर्थ बँकेचे व्हा. चेअरमन धिमाजी घुगे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वतीतेसाठी अभिजीत लाटे, श्रमीक पोतदार, संगमेश्वर व्हनाळे, ज्योती वाचाटे, अप्पु स्वामी, शिवलिंग माळगे, कल्लप्पा कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.