मुंबई -: राज्य शासनामार्फत सन २०११-१२ या वर्षासाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक/कार्यकर्ते), राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी, संबंधित मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांनी सुधारित नियमावलीतील तरतुदीनुसार त्यांची शिफारस, आवश्यक ती कागदपत्रे व संघटनेच्या ठरावासह पात्र इच्छुकांचे अर्ज १५ मार्च २०१३ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ या पत्त्यावर पाठवावीत, असे उपसंचालक क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
     या पुरस्कारासाठी वैयक्तिकरित्या सुध्दा आवश्यक त्या माहितीसह विहित नमुन्यात अर्ज करता येईल. याबाबतचा शासन निर्णय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या www.mahasportal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांची कार्यालये व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
 
Top