मुंबई :- प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. २६ जानेवारी रोजी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी प्रभादेवी,शासकीय वसाहत वांद्रे(पूर्व), गांधी मैदान चेंबूर, पेप्सी मैदान बोरिवली या चार ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभादेवी येथे संकल्प कला मंच यांची देशभक्तीपर गीते, शासकीय वसाहत वांद्रे येथे पांरपरिक लोककला, जादूचे प्रयोग, सनई व संबळ वादन, चेंबूर येथील गांधी मैदानावर मराठी वाद्यवृंद, शाहिरी लोकनृत्य, पेप्सी मैदान गोराई (बोरीवली) येथे लेझिम, दांडपट्टा, तारपा,ढोल, त्रिटिका नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. हे कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिली.
दरम्यान, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वाजारोहण कार्यक्रमात यंदा प्रथमच चित्ररथांचा सहभाग होणार असून त्यात सांस्कृतिक विभागाने चित्रपटसृष्टीच्या शतक वर्षानिमित्तचा प्रवास दर्शविणारा चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथावर राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे चित्रीकरण असून या चित्ररथाचा विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी भारतीय चित्रपटांमधील काही निवडक व्यक्तिरेखा त्या त्या वेशभूषेमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिली.