मुंबई : पोलिसांच्या गणवेषाचे पैसे यापुढे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याबाबत तसेच पोलीस खात्याच्या आधुनिकीकरणाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री आर.आर.पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ,वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी पोलिसांना देण्यात येणा-या गणवेषासाठीचे कापड तुरूंग तसेच खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून खरेदी करण्यात येऊन ते पोलिसांना दिले जायचे. यापुढे मात्र गणवेषासाठी लागणारी रक्कम पोलिसांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. याबरोबरच पोलिसांना पुरविण्यात येणा-या बुटाची रक्कम देखील त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांना आवश्यक असणाऱ्या दारुगोळ्यासाठी तसेच शस्त्रास्त्र खरेदीसाठी त्याचबरोबर वाहन खरेदीसाठी तसेच इंधनासाठी आवश्यक निधी दिला जाईल. पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट असून तो सोडविण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. होमगार्डना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन भत्यात वाढ करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल.