
या सोहळ्याच्या रंगीत तालमीस राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, तसेच पोलीस विभाग व अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय सेनादल, नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई सशस्त्र पोलीस दल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड (पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल (पुरुष/महिला),मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुबई महानगरपालिका सुरक्षा दल, सी. कॅडेट कोअर (मुले/मुली), आर.एस.पी. (मुले/मुली), भारत स्काऊट आणि गाईड्स (मुले/मुली) बॅण्डपथक, बृहन्मुंबईतील वाहतूक पोलीस पथक तसेच आदिवासी नृत्य, कोकणातील लोककला पथक यांनी संचलनात सहभाग घेतला होता. शासनाच्या सांस्कृतिक कार्य, ऊर्जा, उद्योग, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य पर्यटन, कृषी व फलोत्पादन, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान या विभागांच्या चित्ररथांचा या रंगीत तालमीमध्ये समावेश होता.