
नवे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे पुणे विभागीय वरिष्ठ भूजल संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. गेडाम यांनी काम पाहिले आहे. कामात पारदर्शकता व अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. डॉ. गेडाम यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असताना अनेक विकासाभिमुख उपक्रम राबविले आहेत. शिवाय त्यांनी तुळजाभवानी मंदिर समितीचा कारभार अत्यंत चोखपणे पाहिला. डॉ. गेडाम यांची ऐन दुष्काळी परिस्थितीत बदली झाल्याने त्यांच्याकडून विकास संदर्भाती सोलापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गोकुळ मवारे यांनीही दुष्काळी परिस्थितीत अत्यंत नियोजनबध्दपणे काम पाहिले आहे.
* सौजन्य पुढारी