गुवाहाटी -:  ईशान्‍य भारतात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपात जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
           आज सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.9 एवढी नोंदविण्‍यात आली. मेघालय आणि नागालँडसह मणीपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेवेर होता. सुमारे 30 सेकंद भूकंपाचे धक्‍के जाणवले. या परिसरातील अनेक शहरे त्‍यामुळे हादरली. त्‍यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले होते.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top