नळदुर्ग -: वसंतनगर (नळदुर्ग) येथील नाईक मागास सेवा मंडळ संचलित वसंतराव नाईक प्राथमिक व माध्‍यमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्‍नेहसंमेलन उत्‍साहात संपन्‍न झाले.
    विद्यार्थ्‍यांच्‍या सुप्‍त कलागुणांना वाव देण्‍याच्‍या दृष्‍टीने वार्षिक स्‍नेहसंमेलनाच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष वैभव जाधव तर प्रमुख पाहुणे म्‍हणून बी.के. पवार, धोंडीबा माने, टोपाजी राठोड हे उपस्थित होते. या वार्षिक स्‍नेहसंमेलनाप्रसंगी प्राथमिक व माध्‍यमिक विद्यार्थ्‍याने पर्यावरण जाणीवजागृती, स्‍त्रीभ्रूण हत्‍या व स्‍त्री-पुरुष समानता आदीसह विविध समाजोपयोगी विषयाच्‍या अनुषंगाने मुकाभिनय, वैयक्‍तीक नृत्‍य, समूह गीत, एकांकिका या माध्‍यमातून मनोरंजन व लोकप्रबोधन केले. यावेळी महाराष्‍ट्राची लोककला, लोकगीते व लावणी याचे विशेष सादरीकरण करुन विद्यार्थ्‍यांनी रसिकांची मने जिंकली. तर उत्‍स्‍फूर्त काव्‍यवाचन हा प्रेक्षकांच्‍या आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी सादर करण्‍यात आलेल्‍या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरुवात बी.के. पवार व वैभव जाधव यांच्‍या हस्‍ते सरस्‍वती पूजनाने करण्‍यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जेतालाल जाधव यांनी तर सूत्रसंचालन सुरेश नकाते यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाच्‍या यश‍स्‍वीतेसाठी मुख्‍याध्‍यापक जे.एन. लाटे, जी.डी. जाधव, सहशिक्षक सुनील उकंडे, एम.पी. राठोड, सौ. एस.डी. जाधव, सौ. सी.ए. परलकर, विशाल जाधव आदीनी परिश्रम घेतले.

 
Top