बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यास आणि त्यांना सर्वतोपरी सहाय्यता मिळवून देण्यासाठी येथील शिवराज्य सेनेच्यावतीने राजमाता जिजाऊ महिला सुरक्षा हेल्पलाईन, बार्शी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम सभागृहात पार पडलेल्या संकेतस्थळाच्या उदघाटन प्रसंगी महिला पोलीस उपनिरीक्षक पडवळ, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती धस, अँड. उषा गव्हाणे, प्रा.सौ. भारती रेवडकर, शिवराज्य सेनेचे हर्षद पाटील, पत्रकार सचिन वायकुळे, कोठावळे, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमत पडवळ म्हणाल्या, जिजाऊ म्हणजे शिवबाची आई होय. त्यांनी शिवाजीला घडविण्यासाठी अहोरात्र ध्यास घेऊन सर्व पैलू समजावून सांगत चांगल्या स्वराज्याचे शिक्षण दिले. आम्ही महिला पोलिसात काम करताना त्यांचाच आदर्श घेऊन काम करतो, हे काम करीत असताना अतिशय गरीब पिडीत मुली तसेच वेठबिगारी तसेच भिक मागून जगणा-या अनाथ मुलीवर होणा-या अत्याचार रोखण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. समाजानेदेखील गरीब व झोपडपट्टीत जीवन व्यक्तीत करणा-या मुली व स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्याय करणा-यांविरूद्ध आम्ही दंडुक्याचा वापर करतो, शिवराज्य सेनेच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी पोलिसांकडून मदत मिळण्याची हमी दिली.
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती धस बोलताना म्हणाल्या, एकविसाव्या शतकातील भारताच्या वाटचालीमध्ये युवक व युवतींची कार्यक्षमता वाढली पाहिजे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात स्त्रीयांची कार्यक्षमता वाढल्याशिवाय आपला देश महासत्ता होणार नसल्याचे सांगून युवक वर्गावर अन्याय न होऊ देता समाजातील निर्माण होणा-या प्रश्नाने होणारी वातरावरण निर्मिती, स्त्रीयांबद्दल विविध जाती धर्मातील व जिजाऊचे विचार, राज्य कसे असावे या संकल्पना शिवाजी महाराजांनी आत्मसात करुन वाटचाल केली. त्याचप्रमाणे प्रत्येक माता आपल्या मुलाने काय बनावे, ही संकल्पना घडवत असते, त्याच दिशेने ध्येय निश्चिती करुन वाटचाल करणे गरजेचे असल्याचे शेवटी सांगितले.
शिवराज्य सेना बार्शीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना म्हणाले, या कार्यक्रमाच्या दिवशी योगायोगाने स्वामी विवेकानंदांची जयंती लाभली. भारती संस्कृती साता समुद्रापलीकडे पोहचविण्याचे काम युवकांचे स्मुर्तिस्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांनी केले. आपल्या सैनिकांचे मुंडके कापून शरीरात बॉंब ठेवला या नुसत्या फेसबुकवरील गप्पा मारुन चालणार नाही, तर या घटना न होण्यासाठीचे पाऊल टाकले पाहिजे. जिजाऊ हेल्पलाईन ही कोणत्याही शासकीय मदती विना असनू तरुण व शिवभक्त बांधवानी एक भाऊ म्हणून आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कृती आहे. सरच्या संकेतस्थळावरील माहितीची गुप्तता पाळण्यात येईल तसे मदत मिळवून देण्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार सचिन वायकुळे यांनी बोलताना मुली व स्त्रियांकरीता शिवराज्य सेने सुरु केलेला उपक्रम हे नवे पाऊल असल्याचे सांगून धमण्यांमध्ये मद्य नसलेल्या तरूणाईची चळवळ आहे व याठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व युवतींच्या संख्येवरुन कार्यक्रम सार्थ झाल्याचे म्हटले. आज बुकापासून ते फेसबुकापर्यंत तरुणाई दिसते, त्याना संरक्षणासाठी सुरुवात करुन दिली आहे. जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत मोजमाप करता येत नाही. मुलींना व स्त्रीयांना अडचण भासल्यास बार्शी प्रेस क्लबच्यावतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगिले.
प्रास्ताविकात राहुले जगदाळे यांनी बोलताना जिजाऊंनी दोन शिवबा घडविले, शिवकालात सर्वज्ण सुखात नांदत होते त्यांची संकल्पना घेऊन शिवराज्य सेना काम करते. गड, किल्ले, शिवराज्य संकल्पना इत्यादी कार्यात विविध उपक्रमाद्वारे समाजजागृती करु, स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचार वाढले, याप्रक्षा प्रसारमाध्यमे वाढली असे म्हणावे लागेल. पुस्तकात मुलांच्या व मुलींच्या खेळातील मतभेद नको, स्त्री ही देवता, भारतमाता, आदिशक्ती म्हणणा-यांनी चेटकीन कशाला म्हणावे, त्यांचे कपडे तुम्ही कोण ठरविणार, विविध प्रकारच्या समस्या कशाने निर्माण होतात याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, स्व. जगदाळे मामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाचे सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उपस्थित महिला पोलिसांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करताना त्यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देण्यात आले

तुमचे आमचे नाते काय - जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी वातावरणात उर्मी आणली.
मुलींनो आम्ही तुमचे भाऊ - शिवराज्य सेना
मुलींनो आम्ही तुमचे भाऊ - शिवराज्य सेना