पुणे -: वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटतर्फे सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यासाठी दिला जाणारा कै. वसंतदादा पाटील पुरस्कार कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या परिसरात आज झालेल्या कार्यक्रमात सहकारी साखर कारखाना उद्योगातील विविध कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.
        पुरस्कार आणि विजेते कारखाने पुढीलप्रमाणे : कै.विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार - विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा, सोलापूर, कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार - तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर.  सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार - विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमीटेड, वेणूनगर, सोलापूर
उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार (2010 -11) :
      दत्त शेतकरी साखर कारखाना, ता.शिरोळ जि.कोल्हापूर. रावसाहेब पवार, घोडगंगा साखर कारखाना, ता. शिरुर, पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, उस्मानाबाद.
उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार :-
     तात्यासाहेब कोरे साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना माढा, सोलापूर, भाऊराव चव्हाण साखर कारखाना, अर्धापूर, नांदेड.
तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार (दक्षिण विभाग पहिले तीन)
     राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, वाटेगाव, सांगली. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुडीत्रे, कोल्हापूर.  तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर. (मध्य विभाग) - पांडुरंग साखर कारखाना, श्रीपूर, सोलापूर, संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा, सोलापूर.  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना, संगमनेर, अहमदनगर. (उत्तर-पुर्व विभाग) - भाऊराव चव्हाण साखर कारखाना, लक्ष्मीनगर, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, उस्मानाबाद, बाराशिव हनुमान साखर कारखाना, हिंगोली.
राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार : (2011-12) : -
     यशवंतराव चव्हाण पुरस्कार - विष्णू तुकाराम नलावडे,  दुधोडी, ता. पलुस, जिल्हा सांगली.  कै. वसंतराव नाईक पुरस्कार - संभाजी काकाराम जाधव, तांदूळवाडी, वाळवा, जिल्हा सांगली. कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार-अशोक तानाजी फाळके, फाळकेवाडी, वाळवा, सांगली.
     विभागवार उसाचे जास्तीत जास्त उत्पादन काढणारे शेतकरी- दक्षिण विभाग- शंकर मारूती पाटील, शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली.  यशवंत भिवा माने, येडेनिपाणी ता. वाळवा, जि. सांगली. भारत बाबूराव पाटील, ऐतवडे (खु.) ता. वाळवा, जि. सांगली. 
     मध्य विभाग - सुधीर लक्ष्मण मासाळ, केसकरवाडी, भाळवणी, सोलापूर. राजाराम त्र्यंबक पगार, कळवण जिल्हा नाशिक. विलास गजेंद्र पाटील,  नेवरे ता. माळशिरस, जि. सोलापूर.
     उत्तर-पूर्व विभाग :शांताबाई अशोकराव टेकाळे, मुगुटवाडी, ता. अर्धापूर, जि. नांदेड, दिनेश साहेबराव देशमुख, मु. पो. पाटनूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड.  सविता सुभाषराव देशमुख, मु. पो. पाटनूर, ता. अर्धापूर,      जि. नांदेड.
 
Top