उस्मानाबाद -: जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियानानिमित्त्महिलांविषयक कायद्याची माहिती देणाऱया परिसंवादाचे आयोजन महिला व बालविकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ, उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे आयोजित या जाणीव जागृती अभियानामध्ये प्रारंभीच्या सत्रात पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेंच्या प्राचार्य श्रीमती कमल आवटे, अँड. वैशाली देशमुख, अँड. श्रीमती एम.एन.कोल्हे, प्रा. रेखा ढगे, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.बी.मोरे, दिवाणी न्यायाधीश सी.पी.गड्डम यांनी मार्गदर्शन केले.
अँड. देशमुख यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे भारतातील स्थान या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.कोल्हे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे अधिकानियम 2005 या कायद्याची पार्श्वभूमी, व्याप्ती, उददेश व महिलांना होणारा फायदा आदिबाबत मार्गदर्शन केले.
प्रा. रेखा ढगे यांनी स्त्रीभृण हत्या या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. न्या. मोरे यांनी कुपोषण व त्यावरील घरगुती उपाययोजना, सकस आहारबात सविस्तर माहिती दिली. दिवाणी न्यायाधिश गड्डम यांनी महिलांना कायद्याचे ज्ञान असणेआवश्यक असून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण, अनैतिक व्यापार, हुंडा निर्मूलन आदिबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास समाज कल्याण सभापती दगडू धावारे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कांचनमाला संगवे, काशिनाथ बंडगर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचलन आर. बी. काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यु. पी. बिरादार यांनी केले., व्ही.जी यादव डॉ. व्ही. के. परळीकर, महिला बचत गट, निवासी महिला संस्थांच्या अधिक्षीका, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस आदि बहुसंख्येने उपस्थित होते.