उस्मानाबाद -: पाऊस पाणी संकलन आणि पाणी पुनर्वापर याबाबत जनजागृती व्हावी म्हणून टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे शुक्रवार,दि. 4 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व  नगरपालिका व नगरपरिषदांचे अध्यक्ष  व उपाध्यक्ष्‍, सदस्य, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.   सकाळी 11 वा. या कार्यशाळेचे उदघाटन होणार असून जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        या कार्यशाळेत चेन्नई येथील रेनसेंटर संस्थेचे संचालक व जलतज्ज्ञ डॉ. सेखर राघवन हे पाऊस संकलनाबाबत सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय औरंगाबाद येथील भूजल सव्हेक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. शहा आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांचेही कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
 
Top